शनिवार, २८ नोव्हेंबर, २००९

ट्रॉय



ट्रॉय खरतर एक शोकांतीका म्हणावी का शौर्य कथा असा प्रश्न मला नेहमीच पडत आला आहे. हा चित्रपट म्हणजे अविस्मरणीय अनुभवांपैकी एक असा अनुभव. हा चित्रपट पाहताना आपण प्रेक्षक न राहता ह्या कथेतील एक पात्र बनुन जातो. आपण चित्रपट पाहात नसुन जणु ह्यातील मुख्य व्यक्तीरेखांच्या आजुबाजुला घुटमळतोय असे वाटत राहते.

हि कथा खरे तर स्पार्टाची सौंदर्यवती राणी हेलन आणी तिच्या प्रेमात आकंठ बुडुन तिला पळवुन नेणार्‍या ट्रोजन राजकुमार पॅरीसची प्रेमकहाणी, पण चित्रपटाचे (खरेतर ह्या कथेचे) मुळ नायक बनुन जातात ते पॅरीसचा मोठा भाऊ हेक्टर आणी फक्त स्वपराक्रमाने आपले नाव अजरामर व्हावे ह्या इच्छेने पछाडलेला समुद्रदेवता थेटीसचा पराक्रमी पुत्र अकिलीज.



एरीक बाना हा अभिनेता हेक्टर म्हणुन तर ब्रॅड पिट अकिलीज म्हणुन ह्या भुमीका अक्षरश: जगले आहेत. जसे आजही कर्ण म्हणले की पंकज धिर आठवतो तसेच अगदी ह्या दोघांच्या भुमीकांबरोबर घडते.

All my life I've lived by a code and the code is simple: honor the gods, love your woman and defend your country. Troy is mother to us all. Fight for her! म्हणणारा शुरवीर हेक्टर एका बाजुला आणी Myrmidons! My brothers of the sword! I would rather fight beside you than any army of thousands! Let no man forget how menacing we are, we are lions! Do you know what's waiting beyond that beach? Immortality! Take it! It's yours! म्हणणारा अजिंक्य अकिलीज एका बाजुला. ह्यांचा संग्राम हेच खरे ट्रॉयचे वैशीष्ठ्य.



ट्रॉयची कथा खरेतर अतिशय वळणावळणाची म्हणावी लागेल. दोन राज्यातील शांती स्थापन झाल्यावर स्पार्टाचा राजा मेनेलॉसचा पाहुणचार ट्रॉयचे राजपुत्र हेक्टर आणी पॅरीस उपभोगत असतात. ह्याच काळात पॅरीस स्पार्टाची सौंदर्यवती तरुण राणी हेलनच्या प्रेमात पडतो. वयस्क मेनेलॉसची राणी बनुन राहणारी हेलन देखील आपले हृदय पॅरीसला देऊन बसते. परतीच्या वाटेवर हेक्टरला आपल्या लहान भावाने प्रेमत आंधळे होऊन राणी हेलनला देखील आपल्या बरोबर पळवुन आणले आहे हे कळते. भावाच्या ह्या आंधळ्या कृत्याने ट्रॉयचा विनाश होईल हे ओळखुन तो जहाज परत वळवण्याचे आदेश देतो. कोवळ्या वयातला पॅरीस मात्र हेलन परत गेली तर मी पण तिच्या बरोबर जाईन आणी प्रेमात जीव गमावीन असा हट्ट धरुन बसतो. नाईलाजाने हेक्टर ट्रॉयच्या वाटेवर पुन्हा निघतो. ह्या वेळी हेक्टरच्या तोंडी एक अप्रतीम संवाद आहे, तो पॅरीसला म्हणतो "You say you're willing to die for love but you know nothing about dying and you know nothing about love!"

बंधुप्रेमापुढे शरणागती पत्करलेला हेक्टर ट्रॉयला परत आल्या आल्या आपल्या वडीलांना हेलनला परत पाठवुन द्यायची विनंती करतो, त्याला पुढचा अनर्थ टाळायचा असतो. परंतु राजा प्रायम मात्र तीचा सुन म्हणुन सहर्ष स्विकार करतो. ज्याची भिती हेक्टरला असते नेमके तेच घडते. हेलनला पळवल्याने संतप्त झालेला मेनेलॉस आपला महत्वाकांक्षी भाऊ अगॅमेनॉनच्या सह्हायाने ट्रॉयवर हल्ल्याची तयारी करतो. ह्या युद्धात ग्रीकांच्या बाजुने पुन्हा एकदा समर्थपणे उभा राहणार असतो तो म्हणजे अजिंक्य अकिलीज.



ह्यानंतर कथेला छानसा वेग मिळाला आहे. सगळेच सांगुन मजा घालवत नाही पण अकिलीजचे चिलखत घालुन लढणार्‍या अकिलीजच्या चुलतभावाला हेक्टर अकिलीज समजुन ठार करतो. सुडाने पेटलेला अकिलीज हेल्टरला आव्हान देतो. ह्या दोघांच्यातील अंतीम युद्ध म्हणजे उत्कंठेची परिसीमा आणी ह्या चित्रपटातील अत्युच्च क्षण म्हणावा लागेल.



अपोलो मंदीर एकहाती जिंकल्यानंतर अकिलीज आणी हेक्टर पहिल्यांदा समोरा समोर येतात तो प्रसंग कींवा एक विरुद्ध एक लढतीत अकिलीजने बोगॅरीसची केलेली हत्या हे प्रसंग तर अविस्मरणीयच.



एकदा तरी अनुभवावाच असा हा ग्रीक युद्धाचा आणी ग्रीक कथेचा प्रवास जरुर अनुभवा.



1 टिप्पणी(ण्या):

vishal म्हणाले...

Agadi sunder ahe parikshan ! Paravach ha movie lagla hota HBO var ani punha ekda me pahila. Kharach agadi great film ahe. Ani sarvat mahtwacha nirikshan mhanaje he story hector ani achillis chee houn Mazyasathi hee film lifetime favourite ahe . Dhanyawaad for your nice article !!

टिप्पणी पोस्ट करा