सोमवार, १९ जुलै, २०१०

गंध हलके हलके....


काल रविवारी सकाळी १०-३० वाजता प्राजुतैच्या 'गंध हलके हलके..' ह्या म्युझिक अल्बमचे उदघाटन प्रख्यात लेखक, कवी, अभिनेते श्रीरंग गोडबोले ह्यांच्या अध्यक्षतेखीला आणि सध्या गाजत असलेले नटरंगचे दिग्दर्शक रवी जाधव ह्यांच्या उपस्थीतीत पत्रकार भवन, पुणे येथे पार पडले.

आमची प्राजुतै म्हणजे प्राजक्ता पटवर्धन. सध्या अमेरीकावासी पण मनाने कायम इकडेच असणारी हळवी कवयत्री. काही दिवसांपुर्वीच प्राजुतैच्या 'फुलांची आर्जवे' ह्या कवितांचे पुस्तक देखील प्रकाशीत झाले. त्याचवेळेला तिच्या ह्या अल्बम विषयी समजले आणि उत्सुकता ताणली गेली. ह्या पुस्तकाच्या उदघाटनाला जाणे जमले न्हवते, मात्र ह्यावेळी प्राजुतैचा चांगला खडसावणारा मेसेज आल्यामुळे मी एक आठवडा आधीपासूनच तयारीत होतो.

फाऊंटन तर्फे आलेल्या ह्या अल्बमला उत्तम चाली मध्ये बांधलं आहे संगीतकार अभिजीत राणे यांनी, आणि गायलं आहे वैशाली सामंत, बेला शेंडे, मधुरा दातार, संगिता चितळे, अमृता काळे आणि पौलमी पेठे यांनी.




कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंजुश्री गोखले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय, दोन शब्द ह्यानंतर ह्या अल्बमच्या विषयी बोलायला प्राजुतै उभी राहिली. आयुष्यातील एका मोठ्या स्वप्नाची पुर्ती होत असताना पहुन ती बोलता बोलता खुपच भावनाविवश झाली. अल्बमची सुचलेली कल्पना, खास मित्र मैत्रीणींनी दिलेले प्रोत्साहन, पती जगदीश ह्यांच्या भक्कम पाठिंबा.. काय काय सांगावे आणि कोणाकोणाचे आभार मानावेत असे तीला झाले होते. त्यानंतर श्रीरंग गोडबोले व रवी जाधव ह्यांनी मोजक्याच शब्दात केलेल्या भाषणात प्राजुतैला कौतुका बरोबरच पुढिल वाटचालींसाठी शुभेच्छा देखील दिल्या. त्यानंतर पौलमी पेठे ह्यांच्या 'मोगरा फुलाला'ने खर्‍या अर्थाने कार्यकर्माची सुरुवात झाली. त्यानंतर अल्बममधील काही रचना पौलमी पेठे, अमृता काळे, मधुरा दातार, संगिता चितळे ह्यांनी सादर केल्या. काही गाण्यांवरती नृत्य देखील सादर केले गेले. थोड्याश्या उशीराने आगमन झालेल्या बेला शेंडे ह्यानी देखील अल्बमविषयी कौतुकाचे शब्द सांगत त्यातील रचना सादर केली.


कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर आम्ही ताबडतोब प्राजुतैला घेराव घालुन फोटो-सेशन करुन घेतले. त्याचबरोबरीने तीच्या पुस्तकावर तीच्या सह्या घ्यायला देखील विसरलो नाही.








3 टिप्पणी(ण्या):

अविनाश म्हणाले...

कार्यक्रम खुप छान झाला..पुढिल वाटचालिस शुभेछ्या
Avinash

विशाल कुलकर्णी म्हणाले...

मस्त रे परा ! प्राजुतैचे सुद्धा खुप खुप आभिनंदन :-)

Unknown म्हणाले...

प्राजक्ताचं मनापासून अभिनंदन आणि खूप शुभेच्छा....
या कार्यक्रमाबद्दल आधी कळलं असतं , तर नक्कीच आवडलं असतं यायला....

टिप्पणी पोस्ट करा